बांदा : प्रतिनिधी
रोणापाल येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज दुपारी आरती व महाप्रसाद होईल.
यानिमित्त रविवार ११ रोजी सायंकाळी ७ वा. गाळेल महिला मंडळ यांचा हरिपाठ होईल. सोमवार १२ रोजी सायं. ७ वा. स्थानिकांची भजने होतील.
मंगळवार १३ रोजी सायं. ७ वा. हेरंब पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल. बुधवार १४ रोजी सायं. ७ वा. सावंतवाडी ओंकार डान्स अकादमी यांचा ऑर्केस्ट्रा होईल. गुरुवार १५ रोजी सायं. ७ वा. फुगडी व दांडीया नृत्य होईल. शुक्रवार १६ रोजी सायंकाळी ७ वा. स्वामी दयासागर छात्रालय यांचे कार्यक्रम होतील.
शनिवार १७ रोजी सायं. ७ वा. निमंत्रित भजने होतील. रविवार १८ रोजी सकाळी १० वा. सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायं. ७ वा. गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल.सोमवार १९ रोजी सायं. ७ वा. कुंकुमार्जन, महाआरती, खेळ पैठणीचा आणि सत्कार समारंभ होईल.
मंगळवार २० रोजी सायं. ७ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव होईल. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
———












