आपत्ती व्यवस्थापन व आपत्तीपूर्व तयारीबाबत समाजामध्ये जनजागृती आवश्यक 

 – श्री. रोहन खरबस
मंडणगड (प्रतिनिधी) दि. : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालय व लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘आपत्ती व्यवस्थापन’ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र  शासनाच्या  राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्था रत्नागिरी विभागातील श्री. रोहन खरबस मार्गदर्शक म्हणून लाभले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विनोदकुमार चव्हाण, प्रा. महादेव वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी  प्रा. अशोकक कंठाळे यांनी प्रास्तावना करताना ही कार्यशाळा घेण्यामागील उद्देश  स्पष्ट  केला.
यावेळी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. रोहन खरबस यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन ही सरकारी यंत्रणेबरोबरच ती प्रत्येक नागरिकाची, समाजाची जबाबदारी आहे. भुकंप, पुर, चक्री वादरळ, दुष्काळ, आग, महामारी  किंवा मानवनिर्मिती आपत्ती या गोष्टी आपल्या जीवनात आचानक येवू शकतात.  त्यामुळे आपण कायम सतर्क राहाणे आवश्यक आहे. याकरिता पूर्वतयारी, जागरुकता आणि शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास व हे सोपे मार्ग लक्षात ठेवले तर होणा-या नुकसानीची दाहकता कमी करता येवू शकते.  त्याकरिता आपत्ती काळात काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी कांही आपत्ती संदर्भात घ्यावयाच्या काळजीचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.
  अध्यक्षीय समारोप करताना डॉ. विष्णु जायभाये यांनी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्तीपूर्व तयारीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांनी आचनक आलेल्या अपत्तीला तोंड देण्यासाठी काय करावे याविशयी त्यांनी माहिती सांगितली.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साई पवार  यांनी केले तर  आभार प्रा. प्राची कदम यांनी मानले.