राजापूर प्रतिनिधी
तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खाडीमध्ये शिंपले पकडण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चार जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत चौघांचाही बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळ : नाणार इंगळवाडी येथील खाडी परिसर (ता. राजापूर).
नेमकी घटना : शिंपले गोळा करण्यासाठी खाडीच्या पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही वाहून गेल्याची प्राथमिक माहिती.
एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असल्याने नाणार परिसरावर शोककळा.
स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून तातडीने शोधमोहीम सुरू.












