हेत येथे उद्या कविवर्य नारायण सुर्वे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन : मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

वैभववाडी l प्रतिनिधी :वैभववाडी तालुक्यातील हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आले आहे.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करणारे हे स्मारक उभारण्यात येत असून, या माध्यमातून त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांना उजाळा मिळणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला साहित्यप्रेमी, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.