ऐन नवरात्र उत्सवाच्या धामधुमीत राजापुरात एस.टी.डेपोसमोरून दुचाकीची चोरी

राजापूर प्रतिनिधी : ऐन नवरात्र उत्सवाच्या धामधुमीत राजापूर शहरातील एसटीडेपो गुरववाडी परिसरातून हिरो कंपनीची दुचाकीची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दुचाकी मालक सुभाष कुर्ले रा. कोंढेतड राजापूर यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली आहे.
कुर्ले यांनी शुक्रवारी रात्री राजापूर एसटीडेपोसमोर आपली दुचाकी क्रमांक MH08 AA 9401 पार्क केली होती व ते लगतच असलेल्या नवरात्र उत्सव मंडळात कार्यक्रम पहाण्यासाठी गेले होते. मात्र रात्री १.३० वाजता ते दुचाकी पार्क केलेल्या जागी आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही, तात्काळ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता ती आढळून् आली नाही. अखेर कुर्ले यांनी या प्रकरणी शनिवारी सकाळी राजापूर पोलीसांत तक्रार दिली आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर दुचाकी कोणाला आढळल्यास किंवा या घटनेबाबत काही माहिती मिळाल्यास राजापूर पोलीसांशी अथवा मोबा. 7391899212 व 8087297902 यावर संपर्क साधावा असे आवाहन कुर्ले यांनी केले आहे.