ओटवणे गावचा राजेशाही सण दसरा १९, २० ऑक्टोबर रोजी

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावचा राजेशाही सण म्हणजेच जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारा वार्षिक दसरोत्सव येत्या सोमवार व मंगळवार म्हणजे १९ व २० ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात संपन्न होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा दसरोत्सव सोहळा ग्रामस्थ,भाविकांच्या उपस्थितीत अलोट गर्दीत उत्साहात संपन्न होणार आहे. सोमवारी खंडे नवमी दिवशी नवस बोलणे, फेडणे आदिसह शिवलग्न सोहळा इंगळ्यांची अंघोळ म्हणजे (इंगुळके नहाणे ) हा सुवासिनींचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री सत्यनारायण महापूजा तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी नवस बोलणे नवस फेडणे यांसह संचारी पुरुषांची तरंगा सहित खेमसावंत समाधीला भेट आदी कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहेत या प्रसिद्ध दसरोत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात यावर्षीही मोठ्या संख्येने या उत्सवाला भाविकांची गर्दी होणार आहे.ग्रामस्थ भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.