धम्माच्या अनुसरणाने व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तन शक्य – संदेश पवार

कापरे विभागाच्या वर्षावास कार्यक्रमात केले प्रतिपादन

चिपळूण (प्रतिनिधी) : बुद्धाचा धम्म हा मानवी जीवन जगण्याचा मध्यम मार्ग आहे. तो एक उत्तम मार्ग आहे. त्याच्या अनुसारणातून व्यक्ती परिवर्तन शक्य आहे. आणि व्यक्ती परिवर्तनातूनच संपूर्ण समाजाचे परिवर्तन घडते, असे स्पष्ट प्रतिपादन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे सरचिटणीस तथा मुक्त पत्रकार संदेश पवार यांनी येथे केले. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण व मुंबई, कापरे विभाग क्रमांक ८ स्थानिक व मुंबई आणि करंबवणे शाखा , महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचा सातवा वर्षावास कार्यक्रम जेतवन बुद्ध विहार करंबवणे येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कापरे विभागाचे अध्यक्ष राजाराम साळवी तर स्वागताध्यक्ष करंबवणे शाखेचे अध्यक्ष सुभेदार भाऊ पवार हे होते. यावेळी विचारपिठावर संस्थेच्या मुख्य कमिटीचे अध्यक्ष विठोबा पवार, स्थानिक तालुकाध्यक्ष चंद्रकांत सावंत , मुख्य कमिटीचे खजिनदार राहुल पवार, कार्याध्यक्ष शांताराम गमरे, उपाध्यक्ष उदय कदम, कापरे विभागाचे माजी अध्यक्ष मेजर सुभेदार दत्ताराम मोहिते, संस्थेचे उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, खजिनदार संतोष सावंत, सहचिटणीस प्रमोद कांबळे, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष विलास सकपाळ ,साहित्यिक राष्ट्रपाल सावंत, कापरे विभागाचे मुंबई अध्यक्ष संदेश पवार, कळंबस्थेचे सरपंच विकास गमरे, तिसगाव विभागाचे अध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष दिलीप मोहिते, कापरे विभागाचे सरचिटणीस उमेश सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “बुद्धाचा धम्म : व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तनाकडे!.” या विषयावर प्रमुख मार्गदर्शन करताना संदेश पवार पुढे म्हणाले की, समाज बदलाची प्रक्रिया ही व्यक्तीपासून सुरू होते. जेव्हा व्यक्ती बदलते, कुटुंब बदलते, तेव्हा ही प्रक्रिया हळूहळू पुढे जात समाज बदलापर्यंत पोहोचते. त्यामुळे बुद्धाचा धम्म अनुसरणाऱ्या समुदायाने या धम्माचे आचरण धम्मानुसार केल्यास आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकते. व्यक्ती परिवर्तनातून अंतिमतः समाज परिवर्तन घडू शकते. हा विचार मांडताना विविध उदाहरणे देऊन सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनात असे परिवर्तन घडावे याबद्दल विवेचन केले. यावेळी विठोबा पवार यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उद्योजक बना या उपक्रमाची माहिती दिली. तसेच बेरोजगारांना काम देणे, विविध विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन उभे करणे आणि इतर महत्त्वाच्या विषयासंदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. सर्व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यप्रवण बनले पाहिजे असे सांगितले. तर स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी आपल्या भाषणात 16 मे चा संस्थेचा वर्धापनदिनी झालेला कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासदांचे जाहीर आभार मानून आगामी काळातील संस्थेची वाटचाल विशद केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम साळवी यांनी संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेने वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन सातत्याने समाजापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. चळवळीमध्ये तरुणांनी सक्रिय होऊन काम केले पाहिजे असे आवाहन केले. प्रसंगी इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी सुभेदार भाऊ पवार व प्रभाकर पवार यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. बुद्ध पूजा पाठ आनंद पवार व सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आलेला २२ प्रतिज्ञा फोटो फ्रेमचे विभागातील गाव शाखांना वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. कुमारी स्वर्णी भूपेंद्र पवार या विद्यार्थिनीचा धाडसाबद्दल सत्कार करण्यात आला. प्रारंभी उपस्थित यांचे विभागाच्या वतीने स्वागत आणि सत्कार पार पडले. या कार्यक्रमाला आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, जैतवन बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष कुमारशिल पवार, माजी उपाध्यक्ष काळूराम सपकाळ, संतोष गमरे, संजय जाधव, प्रशांत कांबळे, श्रीपत पवार, भूपेंद्र पवार, दिलीप गमरे, दत्ताराम शिंदे, राजेश पवार, सुनील कदम, रोहित पवार, सचिन सकपाळ, बाळकृष्ण पवार, दीपक सकपाळ, मंगेश पवार, उमेश पवार, बुधाजी गमरे, वैभव पवार, मिलिंद पवार, नंदिनी पवार, सारिका पवार, विद्या सकपाळ, सुदेश पवार, श्रावणी मोहिते, दिव्या कदम ,संदेश पवार, अस्मिता पवार, राकेश पवार ,जयेश पवार, मिलिंद पवार ,महिला कमिटी अध्यक्ष कुंदा पवार ,सरचिटणीस सुजाता पवार, सुनील तांबे, श्रीमती स्वागती पवार, सौ सारिका पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार उमेश सपकाळ यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्य लोक उपस्थित होते.