मंडणगडमध्ये नळपाणी पुरवठा योजना व नमो उद्यानाचे उद्या भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन; पालकमंत्री उदय सामंत, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती

मंडणगड प्रतिनिधी : शिवसेना मंडणगड यांच्या वतीने अमृत २.० अभियानांतर्गत मंडणगड शहरातील नळपाणी पुरवठा योजना आणि नमो उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. उद्या, मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कृष्णानगर, गांधी चौक येथे हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर मंडणगड नगरपंचायतीसमोर मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शेखर निकम आणि आमदार किरण सामंत यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, सौ. दीप्ती घडशी, माजी सभापती सौ. अमिता शिंदे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
भूमिपूजन सोहळा आणि जाहीर सभेच्या आयोजनासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून मान्यवरांच्या स्वागताचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंडणगड शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख तथा नगरपंचायत विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव यांनी केले आहे.