मुरादपूर येथील संत तुकाराम महाराज दूध संस्थेचा दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना भेटवस्तू वाटपाचा स्तुत्य उपक्रम

आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेतून व आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांचे मनोबल वाढविण्याचा संस्थेचा प्रयत्न
संस्थेची प्रगती ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यावर अवलंबून- संस्थेचे अध्यक्ष मंगेश बांडागळे

देवरूख (प्रतिनिधी):

दिवाळी हा आनंद, उत्साह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण आहे. या सणाचे औचित्य साधून मुरादपूर येथील संत तुकाराम महाराज सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित यांच्या वतीने संस्थेमध्ये दूध संकलन करणाऱ्या दूध उत्पादकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. दूध उत्पादकांच्या मेहनतीचा सन्मान करत त्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने संस्थेने राबविलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेतून तसेच आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने हा उपक्रम राबविला. हा उपक्रम आमदार शेखर निकम सरांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष मंगेश रमेश बांडागळे, उपाध्यक्ष समीर बांडागळे, सचिव स्वरूप बांडागळे तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्थेचे संचालक रवींद्र बांडागळे, नितीन बांडागळे, अमित बांडागळे तसेच दूध उत्पादक राजाराम चावे, शशिकांत धावडे, महेश धावडे, अमोल कोळी, विजय कोळी, आदित्य बांडागळे, रेवाळे, स्वरूप बांडागळे, सविता बांडागळे व इतर दूध उत्पादकांना संस्थेमार्फत भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश बांडागळे यांनी सांगितले की, संस्थेची प्रगती ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. संस्थेचा विस्तार करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक मनोबल वाढविण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील राहील. कृषी व दुग्धविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच संस्थेचे दूध संकलन वाढविण्यासाठी आणि दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील. दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात दूध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. विशेषतः शेतकरी कुटुंबांसाठी दुग्ध व्यवसाय हा आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांना सणासुदीच्या काळात भेटवस्तू देणे, त्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणे, ही संस्थेची सकारात्मक भूमिका आहे. दूध उत्पादक शेतकरी पहाटेपासून आपल्या जनावरांची देखभाल, चारा-पाणी, दूध काढणे आणि दूध संस्थेकडे पुरवठा करणे अशा विविध कामांमध्ये व्यस्त असतात. त्यांच्या या अथक परिश्रमातून सहकारी दूध संस्थेची प्रगती होत असते. दूध उत्पादकांच्या सहकार्याशिवाय संस्थेचे कार्य प्रभावीपणे पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सन्मान करण्याचा संस्थेचा हा उपक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

सहकार क्षेत्रात केवळ आर्थिक व्यवहारांनाच महत्त्व नसून सभासदांमध्ये आपुलकी, विश्वास, एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे. दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करून संत तुकाराम महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेने ही सहकाराची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे दूध उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या कार्याबद्दल सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत. आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेने आणि आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत राबविलेला हा उपक्रम ग्रामीण सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दूध उत्पादकांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कष्टांना सन्मान देणे आणि सहकारी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे, या दृष्टीने संस्थेचा हा दिवाळी भेटवस्तू वाटपाचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.