आचरा-अर्जुन बापर्डेकर
आंजणारी पूल येथील अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या आडवली येथील रघुवीर उर्फ किरण मसुरकर यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एका वर्षाच्या मुलीचे पितृछत्रच हरवले. सोमवारी आचरा विभाग शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेउन त्यांचे सांत्वन केले.यावेळी शिवसेना आचरा विभागातर्फे रोख पन्नास हजार रुपयांची मदत कुटुंबीयांना करण्यात आली. तसेच आवश्यकता लागेल तेव्हा सांगा आम्ही आपल्या सहकार्यास
तत्पर असल्याची ग्वाही आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे यांनी यावेळी दिली.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर,पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, चंद्रकांत कदम,अभय भ़ोसले, विजय कदम, श्रीपाद वायंगणकर,आडवली माजी उपसरपंच विनोद साटम यांसह अन्य आदी उपस्थित होते.












