दोडामार्ग तालुका गडकोट स्पर्धा उत्साहात संपन्न; कळणे गावच्या ‘प्रतापगड’ प्रतिकृतीला प्रथम क्रमांक

दोडामार्ग:प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य आणि धगधगता इतिहास भावी पिढीमध्ये जिवंत राहावा, या उदात्त हेतूने *’दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप’* यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय गडकोट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील असंख्य ‘छोट्या मावळ्यांनी’ उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या.

या स्पर्धेत कळणे गावातील बालचमूने साकारलेल्या ऐतिहासिक ‘प्रतापगड’ किल्ल्याच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या गटातील कु. ओम भीमराव देसाई आणि कु. हर्षली विष्णू नार्वेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती देऊन गौरविण्यात आले. तसेच, बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली.

गडकोट पाहणी व मान्यवरांची उपस्थिती:

या स्पर्धेतील किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण व पाहणी करण्यासाठी ‘दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप’चे अध्यक्ष श्री. वैभव इनामदार, कळणे सरपंच श्री. अजित देसाई, तळकट सरपंच श्री. सुरेंद्र सावंत-भोसले, दोडामार्ग तालुका मराठा महासंघ अध्यक्ष श्री. उदय पास्ते, श्री. समीर गवस आणि तळकट येथील श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी लहान मुलांच्या कलागुणांना दाद देत आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

स्पर्धेतील सहभागी छोटे मावळे:

या उपक्रमात कळणे, तळकट आणि परिसरातील अनेक बालचमूंनी हिरीरीने भाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने कु. कल्पिता कमलाकर देसाई, कु. कल्पेश कमलाकर देसाई, कु. मधुरा समीर देसाई, कु. मनस्वी प्रवीण देसाई, कु. वेदांत तुषार देसाई, कु. शततारका विनायक देसाई, कु. भैरवी विनायक देसाई, कु. आर्या राकेश डेगवेकर, कु. चिन्मई राकेश डेगवेकर, कु. ओम भीमराव देसाई, कु. हर्षल विष्णू नार्वेकर, कु. अनिश प्रशांत नाईक, कु. विधी गुरुप्रसाद नाईक, कु. स्नेहल भीमराव देसाई, कु. ओवी संदेश देसाई, कु. ऐश्वर्या गुरुप्रसाद नाईक, कु. हर्षद विष्णू नाईक, कु. मयूर निलेश देसाई, कु. सुभाष प्रितेश देसाई (सर्व रा. कळणे), कुमार रोहित राघोबा राऊत, कु. तन्वी विजय मळीक, कु. यश मनोहर देसाई, कु. गणेश दीपक गाड (सर्व रा. तळकट) तसेच कु. रुद्र गवस, कु. शौर्य गवस, कु. साहिल गुरव, कु. आयुष गुरव, कु. उत्कर्ष गुरव आणि कु. ऋतुराज गुरव यांचा समावेश होता.