रत्नागिरी : मराठा मंदिर ग्लोबल स्कूल, रत्नागिरी येथील इयत्ता सातवीत शिकणारी कु . सृष्टी सचिन पाटील हिने हॉकी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे दि. १४ व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय हॉकी निवड चाचणी स्पर्धेत सृष्टीने उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत १४ वर्षांखालील (U-14) मुल ीं च्या गटातील एकूण ६६ खेळाड ूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पहिल्या २४ खेळाड ूंमध्ये सृष्टीची निवड झाली असून, तिने राष्ट्रीय हॉकी संघात (National Hockey Team) स्थान मिळवले आहे. सृष्टीने आपल्या जिद्द, मेहनत आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या यशामध्ये हॉकी प्रशिक्षक सचिन पाटील, सुश ां त पवार, अजय क ांबळे व जीवन जाधव य ांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षिका केतकी सावंत य ां चेही सहकार्य लाभले. सृष्टीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. योगेश पवार, शाळेच्या सचिव सौ. ममता संतोष नलावडे, शाळेच्या समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. अद्विका कामेरकर, सर्व शिक्षकव ृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी य ांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही सृष्टीने उत्तम कामगिरी करून शाळेचे व रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरीच्या मराठा मंदिर ग्लोबल स्कूलच्या सृष्टी पाटीलची राष्ट्रीय हॉकी संघात (National Hockey...













