वाऱ्याचा भोवऱ्याने चौके आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या छप्पराचे पत्रे उडाले

वादळजन्य परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ

सिमेंट पत्रे फुटून छप्पराचे 50 हजाराचे नुवसान

चौके प्रतिनिधी :- रविवारी भर दुपारी 1.15 वाजन्याच्या सुमारास येथील माळरानावरून निर्माण झालेला वेगवान वाऱ्याचा भोवरा (वावटूळ ) घोगावत जवळच असलेल्या चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत घुसला मात्र वाऱ्याला पुढे मार्ग न मिळाल्याने इमारतीच्या मध्यभागी असलेल्या सिमेंटचे पत्रे उडवून देत या वाऱ्याच्या भोवऱ्याने मार्ग काढला यात इमारतीच्या छाप्पराचें पत्रे फुटून गेल्याबे अंदाजे 50 हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

सुदैवाने रविवारची सुट्टी आणि दुपार असल्याने रुग्णांची वर्दळ नव्हती. नेहमीप्रमाणे पर्यायी डॉ.प्रियांका पाटील,समुदय आरोग्य अधिकारी शेवाडे मॅडम,शिपाई नांनू कुंभार हे आपल्या कामात कार्यरत होते.अचानक ही वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सदर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आणि भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच चौके सरपंच यांनी घटनास्थळी भेट दिली.सोमवारी सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.धनगे सर, तालुका पर्यवेक्षक हेमंत कुमार चव्हाण,जि प सदस्या अक्षता गावडे मॅडम, महसूल अधिकारी पी जी गुरव,चौके सरपंच शिवप्रसाद चौकेकर पोलीस पाटील रोहन चौकेकर,ग्रामअधिकारी युवराज चव्हाण तसेच मालवण बांधकाम खात्यातील अधिकारी नितीन पवार यानी घटनास्थळी भेट देत दिली नुकसानाची पाहणी केली.