महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन

Google search engine
Google search engine

फुटबॉल जगतावर शोककळा

ब्राझील : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन अल्पशा आजाराने निधन झाले. पेले यांची मुलगी नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते ८२ वर्षांचे होते. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे.
पेले यांनी फुटबॉल विश्वात दोन दशके त्यांनी अधिराज्य गाजवलं. ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाशिवाय ब्राझीलमधील क्लब सांतोसकडून ते खेळायचे. आपल्या फुटबॉल कारकिर्दीत १३६६ सामन्यांमध्ये त्यांनी १२८१ गोल केले. त्यांची गोल ०.९४ इतकी होती. तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते.