गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी च्या बी.सी.ए. व फॅशन डिझाईन बाबत मार्गदर्शन करण्यात आल.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी च्या प्राध्यापिका प्रतिभा लोंढे व श्रुती यादव यांनी मार्गदर्शन केले.यावेळी इयत्ता बारावी नंतर बी.सी.ए. व फॅशन डिझाईन मध्ये असलेल्या करिअर च्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना असलेल्या विविध शंकांचे निरसन केले.बी.सी.ए.साठी लागणाऱ्या सी.इ.टी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रा संजय सूर्यवंशी,प्रा अभिजित सुर्वे,प्रा.ऋषिकेश लोध,प्रा.गौरव पोंक्षे आदी उपस्थित होते.













