अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने ठोस कारवाई करावी

अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने ठोस कारवाई करावी

मालवणात पारंपरिक मच्छीमारांनी घेतली सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांची भेट

मालवण | प्रतिनिधी : समुद्रात अनधिकृत पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमार संकटात सापडत आहेत. मात्र याबाबत मत्स्य विभागाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. मत्स्य विभागाने योग्य ती कारवाई न केल्यास पारंपारिक मच्छिमारांचा पर्ससीन विरोधात संघर्ष अटळ आहे, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर व पारंपारिक मच्छिमारांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्ताना दिला आहे.

१ सप्टेंबर पासून पर्ससीन मासेमारी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अवैध व परवाना नसलेल्या पर्ससीन नौकांवर कारवाई करावी, या मागणी साठी मालवणातील परंपारिक मच्छिमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त अलगिरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी पारंपारिक मच्छिमार उपस्थित होते.