न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष नाईक यांची निवड

न्हावेली | श्रेयस गावडे : न्हावेली ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्य मधून उपसरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली. या निवडणूकीत उपसरपंचपदी संतोष नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. न्हावेली ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून भाजपचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर हे निवडून आले होते. शुक्रवारी उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडण्यात आली. यावेळी उपसरपंच म्हणून संतोष नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अक्षय पार्सेकर, भारती माळकर, राजेश्वरी कालवणकर, सानिका हळदणकर, निकिता परब, सागर जाधव, अजित चौकेकर, हेमचंद्र सावळ,शैलेश भगत, राजन कालवणकर, समीर पार्सेकर,प्रसाद गावडे,नितीन पालयेकर, सुंदर पार्सेकर, उदय पार्सेकर, महादेव चौकेकर,सुनिल धाऊसकर, वंसत मुळीक, सगुण नाईक, दादा परब, राजेश परब, अनंत परब, सद्गगुरु सावळ, रोहिदास सावळ, दिगंबर परब, प्रकाश गावडे, गितेश परब, मोहन नाईक,भगवान कालवणकर, संजय दळवी,प्रथमेश नाईक, दिपक नाईक, भिवा नाईक, तुळशीदास पार्सेकर, संदेश परब, अमित कोचरेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.