वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार उपयोग ; पाणी पातळी वाढण्यास होईल मदत
वनक्षेत्रपाल कणकवली घुणकीकर यांची माहिती
कणकवली : तालुक्यातील कळसुली गावात उपवनरक्षक सावंतवाडी वनक्षेत्रपाल कणकवली रा. ज. घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ दिगवळे मधील नियतक्षेत्र कळसुली वनराई बंधारा बांधण्यात आला. कळसुली गावातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी व वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पाणीटंचाई उद्भवुणे यासाठी कळसुली गावात वनराई बंधारा बांधण्यात आला असल्याची माहिती वनअधिकारी वनक्षेत्रपाल कणकवली श्री. घुणकीकर यांनी दिली.
यावेळी वन परिमंडळ अधिकारी तानाजी दळवी, वनपरिमंडळ अधिकारी शशिकांत साटम, वनरक्षक कळसुली सुखदेव गळवे, वनरक्षक नरडवे प्रतीराज शिंदे, वनमजूर कळसुली कृष्णा सुद्रिक, वनमजूर दिगवळे तुषार रासम, व स्थानिक ग्रामस्थ आनंद पार्टे, शंकर मुरकर आदीं उपस्थित होते.