लांजा येथील दारु समजून विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : लांजा-वाडीलिंबू येथे दारु समजून रान मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1.10 वा.घडली.
विष्णू शांताराम लोटणकर (51,रा.वाडीलिंबू लांजा,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.गुरुवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी विष्णू लोटणकर हे दहिहंडी असल्याने गावातील मंदिरात दहिहंडीसाठी गेले होते. त्यांच्या खिशात दारुची बाटली होती.दारु समजून त्यांनी रान मारण्याचे औषध प्राशन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले.ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने विष्णू लोटणकर यांना सापूचेतळे प्राथमिक आरोग्य के्ंरदात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.