मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड तालुका.विकास मंडळ-F1428 संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मंडणगड या महाविद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातील मुले आणि मुली या दोन्ही संघांनी तालुका स्तरीय खो-खो सांघीक स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आणि जिल्हास्तरीय रत्नागिरी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेशपात्र ठरले. या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून या दोन्ही संघांचे कौतुक होत आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य खाडे सर, उपप्राचार्य हुल्लोळी सर आणि पर्येवेक्षक बैकर सर यांनी दोन्ही संघाचे अभिनंदन केले.याप्रसंगी हजर असलेले प्रशिक्षक चव्हाण सर,अवेरे सर यांचाही सत्कार करण्यात आला.











