पोलिसांची तत्परता आणि फोंडाघाट मधील वाहतूक सुरळीत!

व्यापारी नागरिकांकडून कर्तव्यदक्षतेचे कौतुक

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट बाजारपेठेचा पोलीस कॉन्स्टेबल वंजारे, कॉन्स्टेबल माने आणि ट्राफिक पोलीस जाधव यांनी गेल्या दोन दिवसात ताबा घेतल्यानंतर वाहतूक कोंडी ला काही प्रमाणात आळा बसला आहे. त्यामुळे हतबल झालेले विभाग, कार्यरत झाल्यामुळे, व्यापारी- ग्राहक- दुकानदार यांनी पोलिसांच्या कार्यतत्परते चे कौतुक केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल माने तर थांबलेली गाडी दिसतात समज देऊन ई चलन करीत असल्याने, चालक वाहकावर वचक बसला आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये वाहतूक प्रवाही राहून खंडित होत नाही. अथवा कोंडी ही होत नाही. हीच पद्धत- व्यवस्था उत्सव काळानंतरही दोन महिने राबवावी, म्हणजे बेपर्वा वागणाऱ्यांना शिस्त लागेल. त्यामुळे अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.

फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतूक कोंडीने उतारपेठ नेहमीच बदनामीस पात्र असते. प्रत्येक दुकानासमोर ग्राहक- ग्रामस्थ बेपर्वाईने आपल्या दुचाकी लावतात,तर काही घाऊक दुकानदारांपुढे दिवसातून बहुतांश वेळा टेम्पो- ट्रक्स मधील मालाचा उतार – चढाव केला जातो. पूर्वांपार फोंडाघाट उतारपेठ म्हणून प्रसिद्ध असली तरी, केवळ बेफिकिर वृत्तीमुळे वाहतूक कोंडी होत असते.