रेडक्रॉस सोसायटीकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
रोटरी क्लब वैभववाडीकडे केले सुपुर्द
वैभववाडी प्रतिनिधी
रेडक्रॉस सोसायटी गोवा यांच्याकडून वैभववाडी रोटरी क्लबला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. वैभववाडी तालुक्यातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कमतरता लक्षात घेऊन चार्टर्ड प्रेसिडेंट रो संतोष टक्के यांनी
रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांच्याशी संपर्क साधून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची मागणी केली होती. रेडक्रॉस सोसायटी यांचेकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वैभववाडी रोटरी क्लबसाठी देणेत आले आहेत. यासाठी माजी असि गव्हर्नर घाटवळ, रो.डॉ प्रशांत कोलते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चा उपयोग वैभववाडी तालुक्यातील गरजूं रुग्णासाठी होणार असल्याचे प्रेसिडेंट रो संजय रावराणे यांनी सांगितले. रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांचे रावराणे यांनी आभार मानले.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी
9423300274, 8766884754 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











