वाळू व्यवसायासाठी घेतले 1 कोटी 21 लाख 25 हजार रुपये; परत दिले फक्त 11 लाख 25 हजार रुपये

फसवणुकीचा गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड येथे वाळू व्यवसायासाठी 1 कोटी 21 लाख 25 हजार रुपये घेउन त्यापैकी फक्त 11 लाख 25 हजार रुपये परत करत फसवणूक करणार्‍या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना 20 मे 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली आहे.

कमलेश विद्याधर सुर्वे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात चंद्रशेखर वसंत गडदे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,संशयित कमलेश सुर्वेने त्यांच्याकडून मे 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत वाळू व्यवसायाचे प्रति टन 250 रुपये मोबदला देतो असे सांगून 1 कोटी 21 लाख 25 हजार रुपये घेतले होते.त्यापैकी कमलेशने फक्त 11 लाख 25 हजार रुपये चंद्रशेखर गडदे यांना परत केले.उर्वरित 1 कोटी 10 लाख रुपये परत न करता ती रक्कम कमलेशने स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन फसवणूक केली.याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात कमलेश सुर्वे विरोधात भादंवि कायदा कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.