भाटये रस्ता बंद होण्याची शक्यता

रत्नागिरी : प्रतिनिधी : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे रत्नागिरीत अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या आणि दगडी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. पावसामुळे भाटये येथील सागरी महामार्गतर्गत येणारा झरी विनायक येथील रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या बाजूच्या डोंगरावरील झाडे वेगवान वाऱ्यामुळे केव्हाही रस्त्यावर पडून तसेच मोठमोठे दगड कोसळून हा मार्ग केव्हाही बंद होण्याची शक्यता आहे.