केंद्र शासनाच्या महास्वच्छता अभियाना मध्ये प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी
स्वप्निल कदम l भुईबावडा :गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या महास्वच्छता अभियानात भुईबावडा येथील लोकप्रतिनिधिं सोबत प्रशासन व ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. भुईबावडा बाजारपेठ येथील प्लास्टिक सह संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावून बाजारपेठ चकाचक झाली आहे. या महास्वच्छता अभियानात ग्रामपंचायत प्रशासन, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने सहभागामुळे बाजारपेठ फुलून गेली होती. प्रत्येकाच्या हातात खराटा व स्वच्छतेचे साहित्य होते बघता बघता ग्रामपंचायत परिसर व संपूर्ण बाजारपेठ चकाचक झाली. यावेळी भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, मा.सभापती भालचंद्र साठे, मा. सभापती मंगेश गुरव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम प्रभू, ग्रामसेवक श्री बोडेकर, तानाजी मोरे, दिलीप मोरे, बाळकृष्ण मोरे, दिनेश मोरे, अमित राऊत, महेश सूर्यवंशी, श्री प्रभुलकर, सदानंद देसाई, महेश दळवी तसेच व्यापारी मंडळाचे सदस्य रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महास्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे सरपंच बाजीराव मोरे यांनी आभार मानले. गावच्या हिताचे असेच अनेक उपक्रम यापुढे देखील राबविले जातील असे सरपंच बाजीराव मोरे यांनी सांगितले. आपल्या सर्वांना चांगले आरोग्य लाभणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घर व परिसरातील स्वच्छता कायम राखली पाहिजे. भुईबावडा गाव स्वच्छतेमध्ये अव्वल ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भालचंद्र साठे यांनी केले.











