बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे आयोजन
नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कुडाळ । प्रतिनिधी : बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार १४ जानेवारी रोजी एक दिवशीय कॅमेरा फेसिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही एक दिवशीय कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेमध्ये विनामूल्य प्रवेश असणार आहे.कोकणामध्ये अनेक गुणवंत कलाकार आहेत. काहींना अभिनय, काहीना नृत्य तर काहींना चित्रकला नाहीतर गाण्यामध्ये चांगली गती असते. त्याच बरोबर काहींचा आवाज चांगला असतो. बोलणे चांगले असते. अनेक कार्यक्रमातून ते अँकरिंग सुद्धा करतात. पण ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर बोलण्याची वेळ येते, त्यावेळी योग्य प्रशिक्षण नसल्याने नेमके कसे सादरीकरण करावे हे समजत नाही.यासाठीच अशा तरुण-तरुणींसाठी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने एकदिवशीय मोफत कॅमेरा फेसिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हि कार्यशाळा होणार आहे. यामध्ये अँकरिंग, न्यूज अँकरिंग, प्रभावी बोलणे, बोलण्यातील एक्स्प्रेशन्स, आवाजातील चढ-उतार याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.कॅमेऱ्यासमोर कसे बोलावे याची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त हा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर असल्याने ही कार्यशाळा फार उपयुक्त ठरणार आहे.आज आवाजाच्या क्षेत्रात सुद्धा रोजगाराची चांगली संधी उपलब्ध आहे. पण त्यासाठी प्रशिक्षणाची सुद्धा गरज असते. पण आपल्या जिल्हयात अशा प्रकारचे योग्य प्रशिक्षण मिळत नाही. याचा विचार करून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रात करियर करू इंच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा फार महत्वाची ठरणार आहे.ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य असली तरी देखील यामध्ये आगाऊ नाव नोंदणी करणे महत्वाचे आहे. त्यासाठी ९३७०४४०८९३ या क्रमांकावर आपली नावनोंदणी करावी असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.