पाटपन्हाळे महाविद्यालयातील ‘एनएसएस’तर्फे शृंगारतळीमध्ये स्वच्छता अभियान

पाटपन्हाळे | वार्ताहर: केंद् सरकारच्या धोरणानुसार देशभर स्वच्छता हि सेवा अभियान गावोगावी राबविण्यात आले. एक तास श्रमदान हा कार्यक्रम राबविताना मुबई विद्यापीठाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे (एन.एस.एस) देखील महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एसवाय बीकॉम आणि बीएच्या सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी शृंगारतळी बाजारपेठ परिसरामध्ये एक तास स्वच्छता व श्रमदान केले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. आसीम भाई साल्हे यांनी स्वच्छतेबाबत नियोजन करून देताना मळन रस्ता, पालपेणे रस्ता, शृंगारी रस्ता आणी बाजार्पेठेमधून जानवळे गावाकडे जाणारा अंतर्गत रस्ता स्वच्छ करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिवाय संपूर्ण वेळ उपस्थिती दर्शविली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छतेसाठीचे आवश्यक ते साहित्य आणि मदतीसाठी सफाई कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. सर्व विद्यार्थ्यांनी चार गटामध्ये रस्ते स्वच्छता करताना प्रामुख्याने प्लॅस्टिक गोळा करण्याचे काम केले. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतक करताना स्वच्छता कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पउपहारची व्यवस्था करून दिली होती याबाबत महाविद्यालयाच्या वतीने ग्रामसेवक , सरपंच महोदय, उपसरपंच आणि सर्व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण सनये, डॉ. प्रसाद भागवत यांनी प्रयत्न केले. स्वच्छ्ता अभियानात डॉ. प्रमोद देसाई, डॉ. दिनेश पारखे, कार्यालयीन प्रमुख श्री. सुधीर टाणकर आणि महाविद्यालय विद्यार्थी सचिव देवराज टाकळकी यांनीही सहकार्य व सहभाग नोंदविला.