मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला हायस्कुल १४ वर्षाखालील विद्यार्थी संघाने जयगणेश इंग्लिश मिडीयम संघाचा ४०-४ असा पराभव करत विजेतेपद मिळविले.
या संघात कर्णधार ईशान बांदेकर, वरद मिटके, आदित्य दुधवडकर, हर्षल शिंदे, आदित्य बर्डे, दुर्वांक घाडीगावकर, पालांडे यांचा समावेश होता. या संघास प्रशिक्षक पपू सामंत, प्रसाद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.