शिरगाव (वार्ताहर)महाराष्ट्र राज्य क्रिडा संचनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित तालुकास्तरावरीय खो- खो स्पर्धेत विविध गटात शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या पटांगणावर शनिवार ७ व रविवार ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षाखालील गटात मुलगे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना क्रिडाशिक्षक आदिनाथप्रसाद गर्जे व कृष्णा कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, प्राचार्य एस.एन.अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











