
भाजप नेते विशाल परब याची ग्वाही
दोडामार्ग येथे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला उपस्थिती
दोडामार्ग l सुहास देसाई :दोडामार्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला व विकासात्मकदृष्ठा काहीसा मागास राहिलेला आहे मात्र येणाऱ्या काळात या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे अशी ग्वाही भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांनी दोडामार्ग येथे दिली.
दोडामार्ग येथील सुशीला नाईक हॉल मध्ये न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण,उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक नितीन मनेरकर, नगरसेवीका गौरी पार्सेकर,नगरसेवीका क्रांती जाधव , नगरसेवीका संजना म्हावळकर,नगरसेवक रामचंद्र मणेरीकर,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,प्रभाकर परब,सौ.प्रमिला परब,विकास परब, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस,सरपंच संघटना अध्यक्ष देवेंद्र शेटकर,माजी नगरसेवक समीर रेडकर , उद्योजक तथा
सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक,आदी उपस्थित होते.
*अर्धांगीनीने डिवचल्यामुळेच…न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम*..
यावेळी बोलताना विशाल परब यांनी सांगितले की,महीला जे सांगतात ते पुरुषांनी ऐकलच पाहीजे हे काहीवेळा घडतं याचा प्रत्यय आता आला
महीला ही महीला असते, डिवचली तर वाघीण असते, म्हणूनच माझ्या अर्धांगीने डिवचल्याने मी दोडामार्गातील महीलांसाठी खास ‘न्यू होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळेच
महीला जे सांगतात ते पुरुषांनी ऐकलच पाहीजे असे मत भाजपा नेत युवा उद्योजक विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केले.
*विशाल परब मला भेटलेला हिरा:चेतन चव्हाण
राजकारणाच्या पटलावर काम करत असतांना मी माणूस ओळखायला शिकलो. माझी आणि विशालची ओळख फक्त दोन वर्षाची आहे पण या दोन वर्षाच्या ओळखीत विशाल परब
मला भेटलेला खऱ्या अर्थाने हिरा आहे असे गौरवोद्गार दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले. ते दोडामार्ग येथील विशाल परब अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
*…संसारासाठी धडपडणारी स्त्री प्रत्येक घराची लक्ष्मी*…
*सौ.वेदिका परब*
यावेळी बोलतांना सौ वेदिका परब यांनी सांगितले की,
स्त्री ही प्रत्येक घरची लक्ष्मी असते ती नेहमीच आपल्या घरासाठी धडपडत असते. त्यामुळे अहोरात्र काम करुन थकलेल्या माझ्या माता भगिनीसाठी करमणुकीच साधन म्हणून हा खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला आहे. भविष्यात महिलांसाठी यापेक्षा मोठे कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही विशाल परब यांच्या अर्धांगीनी सौ.वेदिका परब यांनी दिली. दरम्यान सौ.परब यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमा अगोदर विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सर्वांच्या उपस्थिती वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली यावेळी बोलतांना उद्योजक विवेकानंद नाईक यांनी सांगितले की विशाल परब सारखा युवा उद्योजक आपल्या स्वतः च्या खिशातून अनेक कार्यक्रम आयोजित करून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करीत आहेत दोडामार्ग तालुक्यातील वक्रतुंड मंडळ यांनी केलेल्या कार्यक्रमास भरघोस सात दिली होती त्यांना यावर्षी पुन्हा असेच कार्यक्रम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्याचे कार्य जिल्हयात नव्हे देशभरात कीर्ती व्हावीअसे घडो हया त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी तालुक्यातून हजारों महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या











