गुरुकुल पूरक उपक्रम
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथील गुरुकुल पूरक उपक्रमांतर्गत असलेले तिसरे निवासी शिबीर उत्साहात साजरे झाले. या शिबिरादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भोंडला स्पर्धा झाली.यामध्ये आराध्य रजपूत व श्लोक सावर्डेकर यांनी प्रथम,रुद्र गुरव व सुजल साळवी द्वितीय ,कल्याणी साठे व आराध्या सप्तिस्कर यांनी तृतीय क्रमांक पटकवला.सायंकाळी.विधिवत सरस्वती पूजन झाले.त्यानंतर गुरुकुल पूरक उपक्रमाचे प्रमुख व आपल्या अवीट वाणीने कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ह.भ.प.सचिनबुवा साठे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.त्यांनी महाराणा प्रतापा ची कथा लावली.यावेळी श्री संदेश देवळेकर यांनी हार्मोनियम,तर गंधर्व कवळकर यांनी तबला साथ दिली.त्या नंतर श्री विष्णू प्रासादिक महिला मंडळाचा पारंपरिक नृत्य झाल.सूर्यनमस्कार,खेळ व्यायाम आदी विविध गोष्टींनी तिसरे निवासी शिबीर उत्साहात झाले.यावेळी महादेव परब,गौरव पोंक्षे,विशाखा धावडे ओंकार नामजोशी,अभिजित सहस्त्रबुद्धे,विठ्ठल भोईर,राम बोंबले,गुरुकुल पूरक उपक्रम प्रमुख सचिन साठे,व पालक उपस्थित होते.











