गुहागर (प्रतिनिधी)” साथ मैत्रीबंधची आस समाजकार्याची ” अशा ब्रीद वाक्याने सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या अल्पवधीत गुहागर तालुक्यातील बहुचार्चित असणारे मैत्रीबंध प्रतिष्ठान ; गेले अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, तसेंच क्रीडा क्षेत्रात आपल्या दमदार कार्यातून ठसा उमठवताना पाहायला मिळत आहे. सेवार्थी उपक्रमांचा विडा हाती घेऊन समाज कार्यात आपल्या कर्तृत्वाने अग्रेसर असणाऱ्या मैत्रीबंध प्रतिष्ठानच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य, व सांस्कृतिक अशा विविध उपक्रमांच्या निधी संकलनासाठी पुन्हा एकदा प्रदीर्घकालावधी नंतर मुंबई रंगभूमीवर दोन अंकी शुभारंभाचा नाट्यप्रयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगाच्या तिकिटातून मिळणारी जी रक्कम सामाजिक उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्यासाठी वापर केला जातो. अशा नियोजनबद्ध संकल्पनेतून यावर्षी सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आले आहेत. सामाजिक तसेंच कौटुंबिक विषयांवर सातत्याने आपल्या ज्वलंत लेखणीतून नाट्यविश्वात वेगळीच छाप निर्माण असणारे गुहागर तालुक्यातील खरेकोंड येथील भूमिपुत्र गेले कित्येक वर्ष सातत्याने नाट्यलेखन करणारे हौशी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध लेखक,नाट्यदिग्दर्शक तसेंच स्वतः उत्तम कलावंत श्री यशवंत माणके सर यांच्या लेखणीतून कटू-सत्याचं दर्शन घडवणारी नाट्यकलाकृती अर्चना थिएटर निर्मित आणि नवनिर्माण कलामंच प्रस्तुत..कुटुंब वासल्य हृदयीस्पर्शी जिव्हाळ्याची दोन अंकी नाट्यकलाकृती ” मुक्तागंण ” जन्मदात्या आई-बापाला त्याने वृद्धाश्रम दाखवला पण त्या मायबापासाठी तोच वृद्धाश्रम मुक्तागंण झाला.एक विलक्षनीय मनाला भावणारी सद्याच्या घडीला धक्का धावपळीच्या मॉर्डन दुनियेत नात्या नात्यात विसर पडायला लागलाय. ऐवढं काय तर जन्मदात्या आईवडिलांचा ही त्रास होऊ लागतो.आठवावा लागेल तो श्रावण बाळ ज्याने आपल्या आई-वडिलांना कवडीमध्ये बसवून चारधामाची यात्रा घडवली.ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपलं, कष्टाने लहानचं मोठं केल.
जे आपण दुःख कष्ट भोगले ते आपल्या मुलांच्या वाटेला यायला नको हीच त्यांची अपेक्षा म्हूणन हे वटवृक्ष आपल्या पारंब्याना मजबूत बनवत असतं.पण निसर्ग नियमाप्रमाणे पाखरे मोठी होतात व स्वतःच्या पंखानी भरारी घेण्यासाठी मुक्तसंचार करतात. कालांतराने जन्मदाता आई-वडील जड होऊ लागल्यावर वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. काळीज एकदम धस होतं मनाला अनेक चरे पडतात शेवटी दुभांगून जातात त्या घरच्या वाटा आणि पदरी पडते. ते निराधार दुःख ; आणि वृद्धाश्रमच हेच त्यांचे अखेरचे नंदनवन! बनून राहिलेल्या वृद्धाश्रमात गेलेल्या आईबापाची व्यथा दर्शवणारी वास्तवदर्शी वृद्धाश्रमावर आधारित दोन अंकी भावनिक नाट्यकलाकृती रसिक प्रेक्षकांना शेवटच्या क्षणार्थ आसनस्थ करून ठेवणारी आणि तितकंच समाज संदेश देणारी नाट्यकलाकृती रविवार दिनांक.५ नोव्हेंबर २०२३ रोजी,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर (पश्चिम) मुंबई या रंगमंचावर सकाळी ठीक :१० वाजता.आयोजन करण्यात आले आहे.तसेच अधिक माहिती आणि तिकिट बुकींग करिता श्री रुतेश शिगवण मो. ९७६३७३९५५४ यांच्याशी संपर्क साधावा. तसेंच सर्वानी बहुसंख्खेने उपस्थित राहावे असे आव्हान मैत्रीबंध प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.










