
कमल पवार यांचे निधन
नाणीज : नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून मार्कंडी (ता. चीपळूण, जि. रत्नागिरी) येथील श्रीमती कमल यशवंत पवार यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ४६ वे देहदान आहे.
श्रीमती पवार यांचा मृतदेह कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलकडे आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांची मुले श्री सुरेश यशवंत पवार, श्री गणेश यशवंत पवार, मुलगी सौ सुवर्णा प्रकाश नलवडे, जावई श्री प्रकाश नारायण नलवडे, जावई प्रमोद रामदास पवार, सुना सौ सरोज सुरेश पवार, सौ श्रद्धा गणेश पवार, नातंवंडे डॉ. नेहा प्रकाश नलवडे, तनुश्री नलवडे सिद्धी पवार, पार्थ पवार शर्वरी पवार, वाहिनी सौ कुसुम नारायण चव्हाण व इतर नातेवाईक उपस्थित होते. तसेच स्व-स्वरूप संप्रदायाचे सातारा ज़िल्हा सेवा समिती निरीक्षक श्री सोमदे आप्पा, ज़िल्हा अध्यक्ष श्री अविनाश शिंदे, माजी ज़िल्हा अध्यक्ष श्री उद्धव काळे ,प्रकाश यादव, ब्लड निड प्रमुख इंद्रजित जाधव, कराड तालुका सेवा अध्यक्ष श्री मनोहर माळी, कराड तालुका ब्लड इन निड प्रमुख अनिल कळसे, देणगी प्रमुख इंद्रजित वसव, कराड तालुका माजी सचिव श्री कृष्णत जाधव, श्री दत्ता (दाजी )पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कृष्णा मेडिकल कॉलेज सर्व डॉक्टर, क्लार्क शिंदे मॅडम, अटेंडन श्री दीपक महादेव एटाबे, ट्रान्सपोर्ट विभाग, अनाटॉमी विभाग, सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे देह सुपूर्द करण्यात आला. कॉलेजच्या प्राचार्यांनी तसे प्रमाणपत्र कुटुंबियांना दिले.
जगद्गुरूश्रींनी त्यांच्या संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तसे अर्ज भरून संस्थांनकडे दिले. त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यातील ४६ जणांनी आत्तापर्यंत मरणोत्तर देहदान केले आहे.
गुरूंवरील निष्ठा आणि गुरुंवरील प्रेम यामुळेच जगद्गुरु श्रींचे अनुयायी मरणोत्तर देह दान करत आहेत. आतापर्यंत 46 जणांचे मरणोत्तर देहदान त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.












