चोरी करायची म्हणून तो अंधारात लपला तरीही पोलिसांना अचूक दिसला

रत्नागिरी ः प्रतिनिधी

शहरातील गोडावून स्टॉप येथील साई मंदिरजवळ रात्रीच्या सुमारास चोरीच्या इराद्याने लपून राहिलेल्या संशयिताला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वा.करण्यात आली.

तुषार सुभाष पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.गुरुवारी शहर पोलिस गोडावून स्टॉप येथील साई मंदिरजवळून गस्त घालत होते.त्यावेळी त्यांना त्याठिकाणी संशयित हा अंधाराचा फायदा घेउन स्वतःचे अस्तित्व लपवून चोरीसाठी लागणारे साहित्य जवळ बाळगून मिळून आला.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पक्कड,हेक्सॉ ब्लेड मिळून आले.