सामान्य ज्ञान चाचणी 3 साठी 10 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

रत्नागिरी : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे क्वीझ 3 चे आयोजन करण्यात येत असून यासाठी पुर्ण भारतभर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी 5 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी 10 नोव्हेंबर पर्यंत आपली नोंदणी करावी. जिल्हयातील सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in/  या वेबसाईटवर त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकतात. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी करून सामान्य ज्ञान चाचणी 3 मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. बक्षिसाची रक्कम मागील वर्षांसारखीच आहे.
शालेय विद्यार्थ्यासाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन सन 2019 पासून करण्यात येत आहे. सन 2022 मध्ये फिट इंडिया क्वीझ 2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळाविषयक असलेले ज्ञान कौशल्य इ. साठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. भारतीय खेळांचा समृद्ध इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू इ. बाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा चाचणीचा प्रमुख उद्देश असून यामध्ये रू. 3 कोटी 25 लाख रकमेच्या बक्षिसांचे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात आले.