फोंडा, गोवा (क्रीडा प्रतिनिधी) आज चौथ्या दिवशी खो खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य सामन्यात कर्नाटकचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ओडिशाने केरळचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या महाराष्ट्र महिला संघाची अंतिम लढत ओडिशाशी होणार आहे. फोंडा, गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या सामन्यांना प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात महाराष्ट्र महिला संघाने कर्नाटकचा ५४-३० असा २४ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम आक्रमण करताना महाराष्ट्र महिला संघाने कर्नाटकचे ९ संरक्षक बाद करून १८ गुणांची कमाई केली तर कर्नाटकने ड्रीम रनचे ६ गुण मिळवले. पहिल्या पाळीत संरक्षण करताना महाराष्ट्राने ४ संरक्षक गमावले तर तब्बल १४ ड्रीम रन चे गुण मिळवले. यामुळे मध्यंतराला महाराष्ट्र कडे 32 14 अशी भक्कम आघाडी होती.
महाराष्ट्रकडून प्रियंका इंगळेने २.३० मी. संरक्षण करत १० गुणांची कमाई केली काजल भोरने १.१० मी. संरक्षण करून ८ गुण मिळवले. प्रीती काळेने नाबाद २.२० मी. संरक्षण केले तर पूजा फरगडे ने ८ गुण मिळवले. रेश्मा राठोड ने नाबाद २.०० मी., १.२० मी. संरक्षण करताना २ गुण संपादन केले.
कर्नाटककडून वीणा एम.ने १.४० मी. तर मोनिकाने १.०५ मी., १.४० मी. संरक्षण करत ४ गुण संपादन केले.
महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य सामनात ओडिशाने केरळचा ६४-३० असा एकतर्फी ३४ गुणांनी पराभव केला. केरळ संघाकडून सुथश्री सिंहने १.२० मी. संरक्षण करत आक्रमणात १० गुण मिळवले मधुमिताने १.२० मी. संरक्षण करताना आक्रमणात तब्बल २० गुणांची कमाई केली समर्था साहूने 1ल१.२० मी. संरक्षण करत आक्रमणास ६ गुण मिळवले. समारानिका साहूने ६ तर आदिथ्याने आक्रमण मध्ये ८ गुणांची कमाई केली.
पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ओडिशा संघाने आंध्रप्रदेशवर ४४-४२ असा २ गुणांनी निसटता विजय संपादन केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात ओडिशाचा कर्णधार जगन्नाथ दासने २.४५ मी. १.३० मी. संरक्षण करत आक्रमणात ४ गुणांची कमाई केली. अर्जुन सिंगने १.२५ मी. संरक्षण करत आक्रमणात ६ गुण मिळवले.निरंजन सामलने १.२० मी. संरक्षण करत आक्रमणात २ गुण मिळवले. आंध्र प्रदेश संघाकडून फानिकुमराने १.३० मी. १.२० मी. संरक्षण करत आक्रमणात २ गुण मिळवले, तर हे प्रवीणने २.०० मी. संरक्षण करत आक्रमणात २ गुणांची कमाई केली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र पुरुष संघाने केरळचा ६८-२४ असा ४६ गुणांनी दणदणीत पराभव करीत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. विजेतेपदासाठी महाराष्ट्राची उद्या ओडीसाशी लढत होणार आहे.
पहिल्या डावात संरक्षण करताना अपयशी ठरलेल्या लक्ष्मण गवसने दुसऱ्या गावात १.०० मी. संरक्षण ल करीत आक्रमणामध्ये तब्बल १६ गुणांची कमाई करत केरळचा बचाव भेदून टाकला. रामजी कश्यपणे २.२० मी. संरक्षण करत आक्रमणात ६ गुणांची कमाई केली, तर सौरभ घाडगेने १.०० मी. संरक्षण करताना आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. आदित्य गणपुलेने २.२० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. केरळ संघाकडून निखिलने १.०० मी. संरक्षण करत आक्रमणात २ गुण तर विसाद एस.ने १.१०० मी. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले.