श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): शब्दांना सत्याची धार ही ब्रिद वाक्य घेऊन कोकणात वृत्तपत्र सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दैनिक प्रहार १५ वर्षे पुर्ण करून गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी १६ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
दैनिक प्रहारच्या या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रहार परिवाराच्या वतीने प्रहार रत्नागिरी विभागिय कार्यालयात श्री सत्यनारायण महापुजा व चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
९ नोव्हेंबर २००८ रोजी सुरू झालेल्या दैनिक प्रहारने देश विदेश पातळीवरिल विविध घडामोडींबरोबरच कोकणातील विविध प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या समस्यांविरोधात कायमच आवाज उठविला. त्यामुळे सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून प्रहारची वेगळी ओळख आहे.
रत्नागिरी जिल्हयात मंडणगडपासून राजापूर पर्यंत अनेक राजकिय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडींबरोबरच जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रहारने केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आपलंसे वाटणारे वृत्तपत्र अशीही प्रहारची ओळख आहे.
प्रहारचे संस्थापक आणि संपादकिय सल्लागार केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे, प्रहारचे संचालक माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचे भक्कम पाठबळ आणि मोलाचे मार्गदर्शन यावर प्रहारची यशस्वी अशी वाटचाल सुरू आहे. तर प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, निवासी संपादक संतोष वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात प्रहारची वाटचाल सुरू आहे.
काळानुरूप होणारे बदल लक्षात घेऊन आधुनिकतेची कास धरताना प्रहारने प्रहार डिजिटल माध्यमातुनही यशस्वी अशी भरारी घेत एक वेगळी विश्वासार्हता निर्माण केली आहे.
गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी दैनिक प्रहार १५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त सकाळी रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयात सकाळच्या सत्रात श्री सत्यनारायण महापूजा तर सायंकाळच्या सत्रात चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रहारचे सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन प्रहार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.











