विविध विकासात्मक कामासंदर्भात केली चर्चा
लांजा (प्रतिनिधी) भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथे संघटनात्मक बैठक घेवून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांविषयी लोकांना माहिती देऊन विकास कामासंदर्भात चर्चा केली.
तसेच देवडे येथील शेताकडे जाणाऱ्या अतिशय दुरावस्था झालेल्या साकवाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून त्यासाठी पाठपुरावा करू व संबंधित साकव (ब्रिज) चे काम मार्गी लावू असे ठोस आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच देवडे आदिश्टी वाडी येथे संरक्षण भिंतीच्या संदर्भात मागणी केली होती संबंधित कामाची जागे जवळ जाऊन पाहणी केली व संबंधित काम मार्गी लावू असे स्थानिक ग्रामस्थांना आश्वासित केले. देवडे गावातील सीआरपी प्रज्ञा बेर्डे यांच्याशी संवाद साधून संपर्क से संवर्धन च्या माध्यमातून येथील महिला बचत गटाच्या योजना संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्या समवेत श्रीधर कबनूरकर, मंगेश चव्हाण, संतोष चव्हाण , रमेश गांधी, सागर निंबाळकर, सोमा गंगाराम पिंगळे ,अविनाश कदम, देवडे गावचे सिताराम कांगणे हे उपस्थित होते.