मसुरे | झुंजार पेडणेकर :केंद्र शाळा मसुरेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषय अंतर्गत स्वकल्पनेतून विविध प्रकारचे पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून दीपावलीचा उत्सव साजरा केला. यावेळी प्रशाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखडे, शिक्षण तज्ञ सन्मेष मसुरेकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, शिफा शेख, हेमलता दुखंडे, दादा जाम्बवडेकर आदिनी उपक्रमाबद्दल मुलांचे कौतुक केले.











