वागदेतील दुचाकींचा अपघात अन् प्रकरण पोचले हाणामारीपर्यंत.!

वागदे गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटले.!

कणकवली : तालुक्यातील वागदे येथे मंगळवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास गोपुरी आश्रमच्या गेट जवळ दुचाकींचा अपघात झाला. वागदे गावच्या स्थानिक रहिवासी श्री. ताटे यांच्या गाडीला परजिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकाच्या हॉटेल मधील मुलाच्या गाडीची धडक बसली. ताटे यांनी त्या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे सांगितले की एवढ्या कमी वयाचा आहेस गाडी हळू चालव लायसन देखील तुझ्याजवळ नसेल आणि रागाच्या भरात ताटे यांनी त्या मुलावर हात उचलला. त्यानंतर त्या मुलाने हॉटेल आमंत्रण च्या मालकांना त्या ठिकाणी फोन करून येण्यास सांगितले. त्यावेळी तेथे आलेल्या दोन तरुणांनी ताटे यांच्या कानाखाली मारले. हा प्रकार मंगळवारी दुपारी ३ वाजता घडला.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हॉटेल आमंत्रण येथे वागदे येथील स्थानिक रहिवाश्यांची गर्दी जमा झाली होती. त्याठिकाणी वागदे गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष देखील उपस्थित होते. त्यानंतर सदर हॉटेल व्यवसायिकाने त्या ठिकाणी संतप्त लोक जमा झाल्यावर थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. काही क्षणातच कणकवली पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले व त्या ठिकाणी नेमक घडलं काय याची माहिती घेतली. सदर विषय हा समंज्यसपणे मिटत होता. मात्र त्या हॉटेल व्यवसायिकाची उन्मत भाषा त्या ठिकाणी तो प्रकार लांबवत होती. मात्र ग्रामस्थांनी तेथे सदरील विषय समंज्यसपणे घेतला. त्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी दोन्ही बाजूच म्हणणं ऐयकून घेतले. मात्र पोलिसात फिर्याद देण्यास दोन्ही बाजूच्या व्यक्तींचा नकार होता. मात्र गावचे पोलीस पाटील, सरपंच संदीप सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे, राजकुमार मुंढे, पोलिस हवालदार नाणचे, मंगेश बावधने, किरण मेथे तसेच काही जेष्ठ ग्रामस्थांच्या मध्यस्थीने सदर प्रकरण मिटवले गेले.