एलटीटीचा राजकमल सावंत जलतरण स्पर्धेत अव्वल

खेड | प्रतिनिधी : शहरातील एलटीटी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता ६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या राजकमल सावंत याने जिल्हास्तर स्पर्धेत अव्वलस्थान पटकावले.

इचलकरंजी येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही त्याने ६ वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक रमेश चव्हाण, श्री समर्थ कृपा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे प्रवीण छपरे, हॉटेल व्यावसायिक प्रदोष सावंत, अनिल शिर्के, रवींद्र प्रभू, रूपेश शिगवण, अनिल सदरे उपस्थित होते.