गांजा बाळगणाऱ्या संशयितास अद्याप अटक नाही

दोन्हीवेळा चौकशीदरम्यान फिट आल्याने पोलिसांची अडचण

खेड( प्रतिनिधी) शहरातील नगर परिषद वसाहतीजवळील साई मंदिर परिसरातून पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १७ हजार ५१३ रूपये किंमतीचा गांजा पकडला असला तरी संशयित प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, रा. कातळ आळी-खेड) याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चौकशीदरम्यान दोन्ही वेळा फिट आल्याने पोलिसांची अडचण झाली. मात्र, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे

गांजा विक्री प्रकरणाचेही रॅकेट उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर व त्यांच्या पथकाने कंबर कसली आहे. रात्रीच्या गस्तीदरम्यान गांजा बाळगणाऱ्या प्रथमेश कानडे याच्या त्याच्याकडून १७ हजार ५१३ रूपये येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्या किंमतीचा गांजाही हस्तगत केला आहे. ताब्यात घेतल्यानंतर गांजा नेमका आणला कुठून यासह अन्य प्रश्नांची पोलिसांनी सरबत्ती केल्यानंतर संशयितास फिटच आली. यामुळे पोलिसांनी उपचारासाठी पाठवून नोटीस बजावली होती.

केलेल्या सखोल चौकशीदरम्यान पुन्हा रविवारी पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर फिट आल्याने सोडावे लागले. मात्र, तरीदेखील मंगळवारी किंवा बुधवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करून काढण्यात येईल, असे पोलीस गांजा विक्रीचे नेमके कनेक्शन शोधून निरीक्षक नितीन भोयर यांनी सांगितले.