वेंगुर्ले l दाजी नाईक :महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथील प्रसिद्ध श्रीदेवी सातेरी या आपल्या कुलदैवतेचे जत्रोत्सवा निमित्त दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सातेरी युवक मंडळ मातोंड तर्फे प्रमुख सल्लागार अभय परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मातोंड येथे श्रीदेवी सातेरीच्या वार्षिक जत्रोत्सवात दरवर्षी श्री नार्वेकर हजर राहून दर्शन घेतात. यावर्षीही त्यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
दर्शनानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पशिचम देवस्थान समिती माजी सदस्य दादा परब, गावकर रमाकांत परब, उदय परब, जयवंत परब, दादा म्हालटकर, बाळू परब, राजाराम परब, रविकिरण परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.











