लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे
हिंदू जन आक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आलेल्या घोषणांनी वातावरण भगवे
लांजा | संतोष कोत्रे : लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, विकृत जिहाद्यांना फाशी द्या अशा घोषणा देत हिंदू जन आक्रोश मोर्चा ने लांजा शहर परिसर दणाणून सोडला. निमित्त होते ते लव जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या विरोधात काढण्यात आलेल्या विराट जन आक्रोश मोर्चाचे.लव जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या या राष्ट्र विधातक समस्यांच्या विरोधात रविवारी २२ जानेवारी रोजी सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने लांजा शहरातून विराट असा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील कोर्ले फाटा येथून सकाळी ११ वाजता या विराट हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली .हर हर महादेव, जय जय श्रीराम ,भारत माता की जय च्या घोषणा देत हा विराट मोर्चा मुंबई गोवा महामार्गाने लांजा बाजारपेठेतून हॉटेल योगी इथपर्यंत काढण्यात आला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि घोषणा देत हिंदू बांधवांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रत्येकाच्या हातावर असणारे फलक देखील लक्ष वेधून घेत होते. या मोर्चात लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे देखील समोरे जाऊन ते देखील या मोर्चात सहभागी झाले होते. भगव्या टोप्या, भगवे झेंडे आणि हर हर महादेव च्या गर्जना करत हा मोर्चा रविवारी दुपारी साडेबारा वाजता हॉटेल योगी लॉज येथील पटांगणावर स्थिरावला.
हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या हिंदू बांधवांना या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे श्री. पानवलकर यांनी मार्गदर्शन केले .लव जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या या माध्यमातून हिंदू धर्मा विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप यावेळी पानवलकर यांनी केला. हिंदू धर्मावर एक एकापाठोपाठ एक आघात होत आहेत आणि म्हणूनच आज आपण सुरू केला लढा हा यापुढेही चालू ठेवायचा आहे. मोर्चाची एकूणच मागणी लक्षात घेता सरकारने लव जीहाद विरोधात कायदे करणे आवश्यक आहे .एवढंच नाही तर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील अपेक्षित आहे .लव जिहाद, गोहत्या, धर्मांतरण ही संकटे हिंदू धर्मावर घोंगावत आहेत. या संकटांचे निर्मूलन करण्यासाठी कडक कायदे होणे गरजेचे असल्याचे यावेळी पानवलकर यांनी सांगितले.लांजा शहरातून काढण्यात आलेल्या या हिंदू जन आक्रोश मोर्चा ने खऱ्या अर्थाने आपली ताकद दाखवून दिली. आपला पक्ष, जात बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून सर्वजण या मोर्चा उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.