दापोली येथे उद्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग व ए.जी.हायस्कूल दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या सोमवारी दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता दापोली येथील ए.जी.हायस्कूल येथे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

दापोली शिक्षण संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीराम माजलेकर समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, दापोली विभागीय अधिकारी शरद पवार, दापोली तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी आर.एम.दीघे, नगरपरिषद मुख्याधिकारी हर्षला राणे, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, दापोली शिक्षण संस्थेचे कनिष्ठ उपाध्यक्ष डाॅ.सचिन गुजर, चेअरमन डाॅ.प्रसाद करमरकर, सचिव सौरभ बोडस, सहसचिव निलेश जालगांवकर, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर उपस्थित राहणार आहेत.

उद्या सोमवारी सकाळी ९.०० वाजता गटविकास अधिकारी श्री.दीघे व सौरभ बोडस यांच्या उपस्थितीत विज्ञान दिंडी, ११ ते १ विज्ञान प्रदर्शनचे उद्घाटन, दुपारी १.०० ते ५.०० विज्ञान प्रतिकृती परीक्षण व विज्ञान प्रदर्शन पाहण्यास खुले, मंगळवारी २४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० यावेळेत विज्ञान प्रतिकृती परीक्षण व प्रदर्शन पाहण्यासाठी खुले, दुपारी ११.०० ते १.०० यावेळेत डाॅ.सचिन गुजर , रवींद्र इनामदार यांच्या उपस्थितीत विज्ञान शिक्षकांसाठी प्रा.अनुराग पापिग्राही यांचे व्याख्यान होणार आहे. १ ते ४ यावेळेत डाॅ.प्रसाद करमरकर यांच्या उपस्थितीत प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. बुधवारी २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे. दुपारी १२ ते २ यावेळेत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह भूषविणार आहेत.

विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विज्ञानप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, मुख्याध्यापक सतिश जोशी यांनी केले आहे.