3 डिसेंबर रोजी कणकवलीत होणार शैक्षणिक परिषद

कणकवली ( वार्ताहर) बुक्टू, शिक्षक भारती, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य संघटनाच्या वतीने रविवारी दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कणकवली येथे मराठा मंडळाच्या सभागृहात एकदिवशीय जिल्हास्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेत्या प्रा डॉ तपती मुखोपाध्याय, मुंबई उपस्थित राहणार असून यावेळी बुक्टू चे अध्यक्ष डॉ. जी. बी. राजे, महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते आर. बी. सिंह, शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर, तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी, आशा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहून विविध शैक्षणिक प्रश्नावर भाष्य करणार आहेत.