जिल्हास्तर किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रेमचंद बेलेकरला रौप्यपदक

खेड (प्रतिनिधी) चिपळूण येथील डी. महाविद्यालयात क्रीडा व डी. बी बी. जे. युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील प्रेमचंद बेलेकर याने रौप्यपदक पटकावले.

या स्पर्धेतील १७ वर्षाखालील मुलांच्या ५५ किलो वजनी गटात बेलवकर याने सहभाग नोंदवत प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत रौप्यपदक मिळवले. त्याला क्रीडाशिक्षक दीपक कदम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.