CSC केंद्र व झेराॅक्स सेंटर सुरू करण्यासाठी दिव्यांग रूपेश पवार यांचे जागतिक दिव्यांग दिनापासून आमरण उपोषण!

दिव्यांग रूपेश पवार यांच्या न्यायासाठी ‘ऑफ्रोह’ची जिल्हाधिकारी यांना विनंती

गुहागर (प्रतिनिधी): मंडणगड तहसिल कार्यालयामध्ये किंवा परिसरात CSC केंद्र व झेराॅक्स सेंटर सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती रूपेश वामन पवार यांना जागा उपलब्ध करून देणेबाबत न्याय न मिळाल्याने दि.3 डिसेंबर 2023 रोजी जागतिक दिव्यांग दिनापासून तहसिल कार्यालय,मंडणगड समोर आमरण उपोषण करणार असलयाबाबतचे निवेदन रूपेश पवार यांनी जिल्हाधिकारी ,

रत्नागिरी व तहसिलदार

मंडणगड यांना निवेदन सादर केले आहे.

दिव्यांग रूपेश पवार यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी CSC सेंटर व झेराॅक्स केंद्र चालविण्यासाठी जागेची मागणी शासन निर्णयानुसारच केलीअसल्याने मा.जिल्हाधिकारी व मा. तहसिलदार मंडणगड महोदयांनी रूपेश पवार यांना न्याय द्यावा ,अशी विनंती ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

 

रूपेश पवार हे दिव्यांग असून ते अनेक दिव्यांग संस्थेवर काम करतात. त्यांनी मंडणगड तहसिल कार्यालयामध्ये CSC केंद्र व झेराॅक्स सेंटर सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना जागा उपलब्ध करून देणेबाबत विनंती केली होती.

याबाबत मंडळ अधिकारी,मंडणगड यांनी त्यांचा जबाब घेवून शासन निर्णयानुसार ‘शासकीय जमिनीमध्ये 200 स्केआर फुट जागा देण्यास काही हरकत नसल्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र

अद्यापही याबाबत सकारात्मक निर्णय जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार मंडणगड यांजकडून कळविण्यात आलेला नसल्याने रूपेश पवार यांनी जागतिक अपंग दिनी 3 डिसेंबर पासून तहसिल कार्यालय मंडणगडसमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.