रत्नागिरी :जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून सन 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणा-या जिल्हापातळी ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत विविध संस्थाना व वैयक्तिक स्तरावरून नामांकन भरणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. नामांकन हे प्रामुख्याने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविण्यपूर्ण काम करणारे उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट शाळा व महाविद्यालय, उत्कृष्ट संस्था (शाळा व महाविद्यालय वगळून), उत्कृष्ट समाज संस्था, उत्कृष्ट पाणी वापर संस्था व उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (www.awards.gov.in) दि. 15 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत भरणे आवश्यक आहे. नामांकन भरण्यासाठी मागील एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती या पात्र असणार आहेत.
या पुरस्कारासाठी जिल्हयामध्ये जलसंवर्धनाचे व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, समाजसंस्था किंवा उत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती यांनी या स्पर्धेसाठी नामांकन भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.
जिल्हयातून नामांकन भरलेल्या संस्था / व्यक्ती यांनी आपली संक्षिप्त माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या iecwssoratnagiri@gmail.com या मेलवर दि. 18/12/2023 अखेर सादर करावी असे आवाहन जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी केले आहे.











