माघी गणेश जंयतीचे औचित्य साधुन कुडाळ तालुक्यातील कलेश्वराच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या आणि कलावंताची भुमी असणारे नेरुर गावच्या ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळाचे उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरोउद्गार प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गेले ४२वर्ष हे मंडळ सातत्याने सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करत असुन त्याच्या या सातत्य पुर्ण उपक्रमातुन अनेक लोकांना हक्काचे व्यासपीठ तर मिळालेच त्या सोबतच विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करुन घेत त्यांच्या कलागुणाना वाव देणाऱ्या या मंडळ प्रा.खानोलकर यांनी कौतुक ही केले
नेरुर मध्ये नुकतीच संपन्न झालेल्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेसाठी त्याना परिक्षक म्हणुन मंडळाने निमंत्रित केले होते.या वेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना सह शिक्षकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता.प्रा.वैभव खानोलकर महाराष्ट्र युवा व्याख्याते म्हणुन प्रसिद्ध असुन लोककला दशावताराचे अभ्यासक म्हणुन ही त्यांनी वेगळी ओळख आहे महाराष्ट्र आणि गोव्यासह इतर राज्यात ते सुत्रसंचालक तथा निवेदक म्हणुन ही त्याना विशेष मागणी असते.त्याच बरोबर ते वक्तृत्व कथाकथन,निंबध,काव्य आदी विषयाचे परीक्षक म्हणुन ते विविध ठिकाणी काम करतात .राज्यास्तरावर, विद्यापीठ स्तरात आदी ठिकाणी ते वक्तृत्व स्पर्धाचे परिक्षक म्हणुनही त्यांना निमंत्रण असते.नेमळे पंचक्रोशी माध्यमिक आणि न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले या ठिकाणी अध्यापक म्हणुन काम करणाऱ्या प्रा.खानोलकर यांचे विद्यार्थी ही विविध स्पर्धेत सातत्याने यशस्वी होत असतात
शालेय मुलांच्या स्पर्धेसाठी निवृत्त शिक्षक पाटकर गुरुजी व प्रा.खानोलकर यांनी यावेळी परिक्षणाचे काम केले.
या वेळी या कार्यक्रमासाठी या मंडळाचे अध्यक्ष गोपाळ नेरुरकर,सौरभ पाटकर हरिश्चद्र राऊळ,गणेश वालावलकर,आदी मंडळाचे व कलेश्वर देवस्थानचे पदाधिकारी हि उपस्थित होते.